इतिहास

गावाचा इतिहास 
असे म्हणतात की पुर्वी प्रवरा परिसरामध्ये सात तळी होती तेथे लोक वस्ती करून राहत होते हळुहळु लोक एकत्र येऊन त्यांनी गाव स्थापन केले सात तळयानवरून या गावास सात्रळ हे नाव पडले। सात्रळ गावाची  स्थापना इ।स।न। 1953 मध्ये झाली व तेथे 22 मे 1955 रोजी  ग्रामपंचायत उदयास आली ।येथे  दोन व्यक्ती स्वातंत्र्रय  सैनिक होहुन गेलेल्या  आहेत। येथे सुमारे 150 वर्षापासुन प्राथमिक शिक्षणाचा उदय झालेला होता।सात्रळ या गावास अतिशय जुना राजकिय वारसा लाभलेला  आहे।या गावामध्ये एक इतिहास कालिन खंडोबाचे मंदिर आहे। सात्रळ या गावामध्ये इतिहास कालिन काळामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी महादेवाचे मंदिर बाधलेले आहे।इग्रजांचा वारसा पुरातन काळापासुन या परिसराला लाभल्ेाला  याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परिसरात  थाटलेला इरिगेशन बंगला व आॅफिस व त्याच्या पासुन गेलेला प्रवरा नदीचा उजवा कालवा । कर्मवीर आण्णाच्या टृष्टीकोणातुन सर्वप्रथम शैक्षणिक सुविधा माध्यमिक विदयालयाच्या माध्यमांतुन सात्रळ या गावास निर्माण झाली ।

गावाची स्थापना 
सात्रळ या खेडे गावाची  गावची स्थापना 22।07।1955 रोजी झाली ।

इतिहासातील नोंदी 
सात्रळ या गावामध्ये एक इतिहास कालिन वाडा आहे तसेच एक इतिहास कालिन सात्रळ गावचे ग्रामदैवत समजले जाणारे खंडोबाचे मंदिर आहे।

गावातील मंदिर   
सात्रळ या गावांध्ये एकुण सहा मंदिरे आहेत त्यामध्ये सात्रळ गावचे ग्रामदैवत समजले जाणारे खंडोबाचे मंदिर तसेच महादेवाचे मंदिर आहे तसेच  नदीच्या कडेला दत्ताचे मंदिर आहे तसेच हनुमानाचे मंदिर गणपती मदिंर विल म​िंदंर आहे।