योजना

गावात राबविण्यात येर्णाया  योजना किंवा प्रकल्प

 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 
  सात्रळ गावास  सन 2000 2002 मध्ये  संत गाडगेबाबा  पुरस्कार मिळालेला आहे। तसेच सन 2002 2003 मध्ये  संत गाडगेबाबा  पुरस्कार सन 2004 2005 मध्ये  संत गाडगेबाबा  पुरस्कार
 • संपुर्ण स्वच्छता अभियान 
  सात्रळ या गावाने साने गुरूजी  स्वछता अभियान भाग घेतलेला आहे।
 • निर्मलग्राम पुरस्कार 
  सात्रळ गावाने निर्मलग्राम या स्पार्धेत भाग घेऊन  त्या अंतर्गंत काम करत  आहे।
 • गाव कसे प्रवृत्त झाले त्याबददलची माहिती 
  सात्रळ गावांतील लोकांना प्रवृत्त करण्यासाठी गावातील सरपंचानी     ग्रामसभा  घेऊन लोंकाना वेळोवेळी पटवून सांगितले कोणत्याही  गावचा विकास हा एक किंवा दोन व्यक्ती मुळे होत नाही।तसेच वेगवेगळया कार्यशाळा घेऊन लोकांना माहिती दिली । लोकांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दुर केले। गावातील महिलानां वेगवेगळया माध्यमाचा वापर करून गावामधील कोणत्याही कामासाठी महिलांचा सहभाग महत्वाचा आहे हे पटवून दिले। हे गावातील महिला समजल्यानंतर त्यांनी उत्फुर्त प्रतिसाद देण्यास सुरूवात झाली त्यामळे  गावचा विकास झपाटयाने होण्यास फार मोठी मदत झाली तसेच विविध लोक जागरनाचे कार्यक्रमाव्दारे गावातील लोकांना पटवुन सांगण्यात आले।
 • पुर्वीची स्थिती व माहिती 
  सात्रळ हे गाव प्रवरा नदीच्या काठी वसलेले असल्याने तसेच तालुक्याच्या                                                                     ठीकाणापसुन  शेवटच्या टोकाला असल्यामुळे सर्वागिन विकास होण्याकरिता काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला।गावांमध्ये पर्वी महिलांना उघडयावरती सौचालयास जावे लागत असे गावामध्ये कोणत्याही प्रकारची दळणवनाची सुविधा नव्हती । नदी वरती पुल नसल्यामुळे नदीला पाणी आल्यावर लोंकाची  सर्व कामांना अडथळा येत असे। या कारणामुळे गावामध्ये गरिबिचे प्रमाण जास्त प्रमाणात होते। तसेच गावात शिक्षणच्या सुविधा कमी असल्यामुळे या ठिकाणचे लोक अक्षित होते त्यामुळे  अंधश्रध्दा वरती जास्त प्रमाणात  विश्वास ठेवला जात असे।तसेच गावामध्ये सावकारी चालत असे या कारणामुळे गावचा विकास होण्यास अडथळे निर्माण होत। घेले।
 • लोकांचा प्रतिसाद 
  सात्रळ या गांवामधील लोकांचा पहिल्यादी प्रतिसाद फारच कमी होता । पण
  जेव्हा गावातील लोकांना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तसेच इतर पुरस्कार मिळण्यास सुरूवात झाली तेव्हापासुन लोंकाचा प्रतिसाद मोठया प्रमाणात वाढत गेला आज या सर्व कारणामुळे गावची सरपंच म्हणुन एक महिलाच काम पाहात आहे।
 • लोकांचा सहभाग मिळविण्यासाठी केलेली उपाय योजना 
  लोकांचा सहभाग मिळविण्यासाठी  वेळोवेळी वेगवेगळया कार्य शाळा घेऊन या कार्य शाळेतुन लोकांना पटवुन दिले। तसेच काही लोकांना ग्रामपंचायत योजनांचा फायदा झाल्यामुळे उरलेल्या सर्व लोंकानी जास्त प्रमाणात सहभाग घेण्यास सुरूवात केली व आज सात्रळ या गावामध्ये सर्व थरातील गरीब श्रीमंत किवा कोणताही जातीयता भेदभाव न करता सर्व लोक हे उत्फुर्तपणे सहभाग घेत आहेत।
 • महिलांचा सहभाग 
  सात्रळ गावामध्ये महिंलाचा सहभाग मोठया प्रमाणात आहे। या कारणामुळे आज सात्रळ गावची सरपंच एक महिला आहे। गावातील कोणतेही काम असो स्वच्छता अभियान असो नाही तर दुसरे कोणतेही काम असो सर्व कामाध्ये महिलांचा सहभाग हा मोठया प्रमाणात आहे। या कारणामुळे आज सात्रळ गाव प्रगती व एक आदर्श गाव या नावाकडे वाटचाल करत आहे।
 • झालेला बदल 
  आज गांवामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। आज गावातील प्रत्येक व्यक्ती हा  साक्षर बनत आहे। काही काळापुर्वी गावांमध्ये अनेक लोक कोणत्या न कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेले होते । आज गावांमध्ये  अतिशय कमी लोक व्यसनाच्या आहारी आहेत। या गावचा विकास सर्व क्षेत्रात अतिशय वेगाणे होतांना दिसत आहे। गावांंमध्ये कोणताही उत्सव असो यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठया आंनदाने भाग घेतात।
 • मिळविलेले पुरस्कार  
  सात्रळ गावास तीन वेळेस  सन 2000 2002 मध्ये  संत गाडगेबाबा  पुरस्कार मिळालेला आहे। तसेच सन 2002 2003 मध्ये  संत गाडगेबाबा  पुरस्कार तसेच सन 2004 2005 मध्ये  संत गाडगेबाबा  पुरस्कार मिळालेला आहे।
 • सदयास्थिती 
  आज गांवामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। गावांमधील आजाराचे प्रमाण घटले आहे। तसेच गाव हागणदारी मुक्त झालेले आहे। गावांत  साक्षरतेचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे। गावांमध्ये सर्व शाळा व कॉलेज आहेत। तसेच गावातील प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम करतना दिसतात। गावांतील लोकांचे आरोग्य मोठया प्रमाणात सुधारलेले आहे। सात्रळ गावांतील सर्व लोक गुण्या गोविंदाने राहातानी दिसत आहे।

गावात विशिष्ट  क्षेत्रात कार्य केले असेल तर माहिती

 • शेती विषयक  
  सात्रळ या गावांध्ये शेतीमध्ये आधुनिक पध्दतिचा  केला जात आहे।    सात्रळ या गावामध्ये प्रामुख्याने मुख्य पिके ऊस ़गहु ़ सोयाबीन ़ बाजरी ़ मका ़   डांळीब  ़ कांदा  ही घेतली जातात। तसेच या गावांमध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचनाचा वापर केला जातो। या गावामध्ये शेत तळे आहेत ती शेत तळे शेती महामंडळाच्या नियमानुसार तयार करण्यात आलेली आहेत।तसेच या शेत तळयात जोड व्यावसाय म्हणुन मच्छिपालन केले जाते
 • गांडुळ खत 
  या गावांमध्ये मोठया प्रमाणात गांडुळ प्रकल्प आहेत। त्यापासुन घरगुती व कमी खर्चात सेंद्रिय खत तयार होते।

 • सौर उर्जा 
  गावामध्ये काही काळापुर्वी एकही व्यक्ती सौर उर्जेचा वापर करत नसे। पण जसजसे तंत्रज्ञान वाढत गेले व विजेची बचत होते हे लोकांना माहित होत गेले।
  गांवामध्ये बहुतांशी लोकानीं सौर उर्जेचा वापर करण्यास सुरूवात केली आहे।