सात्रळ

ग्र्रामपंचायतीची प्राथमिक माहिती

गावाचे नाव सात्रळ
ता। राहुरी
जिल्हा अहमदनगर

प्रस्तावना 
सात्रळ हे गाव प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले एक खेडे गाव आहे। सात्रळ गावची स्थापना दि।22।07।1955 रोजी झाली । सात्रळ हे गाव अहमदनगर या शहरापासुन  सुमारे 65 कि। मी। अंतरावर आहे।राहुरी तालुक्या पासुन 26 कि। मी।अंतरावर आहे। जगप्रसिध्द शिर्डी या तिर्थस्थळापासुन 31 कि। मी। अंतरावरती सात्रळ हे गाव आहे।तसेच  शनि शिंगनापुर  पासुन 51 कि। मी। सात्रळ हे गाव आहे। सात्रळ हे गाव पंचकृषी म्हणुन ओळखळे जाते। सात्रळ गावचा परिसर हा बागायती आहे। या गावातील शेती हा प्रामुख्याने मुख्य व्यावसाय आहे। या गावांमध्ये खंडोबाचे प्रसिध्द जागृत देवस्थान आहे। सात्रळ या गावामध्ये विविध माध्यमातुन पत्रकार संघ कार्यरत आहे। राहुरी तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणुन सात्रळचा नावलौकीक आहे। व्यापाराचे सुसुत्रीकरण करण्याकरिता दर मंगळवारी गावाचा आठवडे बाजार भरतो।येथे शिक्षणाच्या पायाभुत व मुलभुत सुविधा उपलब्ध असुन माहिती तंत्रज्ञानाची त्यात भर आहे।येथे विकासाबरोबरच माणसुकीचे दर्शन घडले जाते।